नाटळ-सांगवे विभागात श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा विविध कार्यक्रमानी साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : भाजप विभागीय कार्यालयात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मारूती मंदिर भिरवंडे, स्वामी समर्थ मठ दिगवळे, हनुमान मंदिर नाटळ व नरडवे येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी मा संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ संजना संदेश सावंत, विजय भोगटे,बाबू सावंत, विनय सावंत,नाना काणेकर,प्रफुल्ल काणेकर, मयुरी मुंज, राजश्री पवार,अमिता सावंत,विनोद सावंत, राजू पवार,मीनल पवार, भाई सावंतआणि भक्त मंडळी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.उपस्थित रामभक्तानी जल्लोष साजरा केला. जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी उपस्थितांना गोड प्रसादाचे वाटप करण्यात आले.संध्याकाळी 5.30 वा भाजपा कार्यालय कनेडी येथे महा आरतीचे आयोजन करण्यात आले.

error: Content is protected !!