कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून आणि आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दारिस्ते मुख्य रस्ता(३ कोटी १४ लाख), नाटळ फाटा ते थोरले मोहुळ रस्ता (३ कोटी ८६ लाख) व राज्य सरकार अर्थसंकल्पीय तरतुदीतून कुंभवडे मुख्य रस्ता (१ कोटी ७३ लाख) रस्त्याचे भूमिपूजन आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी हा रस्ता मंजुर व्हावा म्हणून सतत पाठपुरावा करणारे माजी जी प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,संजना संदेश सावंत, सरपंच सानिका गावकर, सुनिल गावकर,उपसरपंच संजय सावंत, सुशांत सावंत, पंढरी तायशेटे,सुरेश गावकर, बाबी साळसकर, विठ्ठल रासम,गोपी सुतार,भाई सावंत,सोन्या सावंत,नंदू सावंत,नेहा सावंत, वैशाली कदम, लक्ष्मण ठाकूर, संजय गावकर,गणेश कदम, पांडुरंग पवार,सुनिल पवार,अनंत शिरसाट,मदन बागवे, भरत दारिस्तेकर, सुनीता पवार, महेश मेस्त्री, अतुल जाधव, संतोष देसाई, लवू रासम, दत्ता सावंत, महेश सावंत, राजू सावंत,हेमंत सावंत,सुनील ठाकूर,मंगेश गुरव, विनायक गुरव, प्रवीण पवार, वसंत सावंत,अंजली शिरसाट, ओंकार ठाकुर आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.उपस्थितातून आमदार व संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले..
आ. नितेश राणेंच्या हस्ते नाटळ विभागात 9 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन












