नवीन कुर्ली प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

प्राथमिक शिक्षणातूनच सर्वांगिण प्रगती साधता येते – अभिनेता निलेश पवार

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अमित दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते निलेश पवार उपस्थित होते, यावेळी मुलांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, माजी अध्यक्ष राजेंद्र कोलते तसेच सदाशिव राणे सर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्ताविक मुख्याध्यापिका जोशी मॅडम, सूत्रसंचालन वरवडेकर मॅडम व पाटील मॅडम यांनी केले.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित दळवी, उपाध्यक्षा मानसी चव्हाण, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, उपाध्यक्ष सुरज तावडे, सचिव धीरज हुंबे सर, कृष्णा परब, रविंद्र नवाळे, सदाशिव राणे, सत्यवान सुतार, कृष्णराव पवार, कृष्णा परब,अरुणोदय पिळणकर ,अरुण पवार, प्रकाश दळवी,जनार्धन पवार, बाळकृष्ण चव्हाण, सखाराम हुंबे, विनायक कुबडे, प्रसाद नांदगावकर, स्वयंसेविका भक्ती नार्वेकर, अमृता पवार, प्रिया दळवी, शिक्षिका हुंबे मॅडम, चव्हाण मॅडम तसेच इतर पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!