श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांचे शनिवारी कलमठ-नाडकर्णीनगर येथे आगमन

कणकवली (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र अक्कलकाेट स्वामी समर्थ पालखीचे शनिवार दि.27 जानेवारी राेजी कलमठ-नाडकर्णीनगर येथील पुण्याई प्रसाद-विश्राम रासम यांच्या घरी आगमन हाेणार आहे.

सकाळी 9 ते 10.30 वा. पालखी पादुकांचे आगमन व महाआरती त्यानंतर दुपारी 11.45 ते 3.30 दर्शन व महाप्रसाद असणार आहे.भाविकांनी श्री स्वामी समर्थ पालखीचे व पादुकांच्या दशर्नाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्राम रासम परिवार व स्वामी समर्थ भक्त परिवार कलमठ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!