काळसे बागवाडी येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती

चौके (प्रतिनिधी) : काळसे बागवाडी येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत राऊळ,सुजाता परब,मोनिका म्हापणकर,लक्ष्मण माडये,हरी खोबरेकर,बाळ महाभोज,दिपक कोरगांवकर,ललित कोरगांवकर,संदीप नार्वेकर,प्रशांत खोत,राजू परब,नंदू प्रभु,राजू कोरगांवकर आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बागवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामासाठी २५/१५ योजनेअंतर्गत ५ लाख निधी मंजूर केल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांचे स्थानिक ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!