ठाणे येथील नागरिकांची समर्थ आश्रमातील बांधवांना प्रजासत्ताक दिनी सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : ठाणे येथील नागरिकांच्या समुहाने ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमला भेट देवून आश्रमातील बांधवांची सदिच्छा भेट घेवून त्यांची विचारपूस केली. विशेषतः समुहातील उज्वला शरद ओवळेकर उर्फ उज्वला म्हात्रे यांच्या २५ जानेवारी वाढदिवसा निमित्ताने आश्रमातील स्री – पुरूष बांधवांना कपड्यांची भेट देण्यात आली. शकील शेख यांच्या वतीने बांधवांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. एकंदर समुहाच्या वतीने बांधवांना कपडे, बिस्किट्स व सुख्या खाऊची भेट देण्यात आली.

या समुहात ठाणे येथील दिपक भालेराव, कृष्णा, शकील शेख, नंदकिशोर धसाळ, चंद्रकांत पाटील, डॉ.सुरेश भोसले, कन्हैया पाटील, विष्णू म्हात्रे, कृष्णा सूर्यवंशी, उज्वला शरद ओवळेकर या मान्यवरांचा सहभाग होता.

समुहातील डॉक्टर सुरेश भोसले यांनीं आश्रमातील बांधवांची आरोग्य तपासणी केली करून उपचार सुचवले व लागणारी मेडिसिन आपण स्वतः फ्री मध्ये उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण आश्रम ला भेट देत त्यानी आश्रमचं काम खरंच चांगलं आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.समुहातील सदस्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल जीवन आनंद संस्थेतर्फे राम अडसुळे यांनी आभार मानले.

जीवन आनंद संस्थेचे खाजिनदार रामचंद्र अडसुळे, भाईदास माळी,दिपाली मेघा-माळी गोविंद मार्गी यांनी ठाणे समुहातील पाहुण्यांचे आदरातिथ्य केले.रामचंद्र अडसुळे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

error: Content is protected !!