अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी तुषार परभू ला 3 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात पोक्सो सह अन्य कलमानुसार अटक केलेला आरोपी तुषार परभू ( सध्या रा वागदे, मूळ रा. मुटाट, ता देवगड ) याला विशेष जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली. इन्स्टाग्राम वर ओळख झाल्यानंतर आरोपी तुषार याने पीडित मुलीवर वागदे आणि साकेडी फाटा येथे बलात्कार केल्याची फिर्याद पीडितेने दाखल केली होती. त्यानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी आरोपीला अटक करून आज विशेष जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता आरोपिची 30 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!