फाेंडाघाट (प्रतिनिधी) : नवजीवन तरुण मंडळ व रमाई महिला मंडळ घोणसरी (आंबेडकरनगर) मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक तुकाराम जाधव यांनी आपली आई कालकथित आशा तुकाराम जाधव यांच्या स्मरणार्थ, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळा घोणसरी नं.०१ येथे इयत्ता पहिलीतील ५६ विद्यार्थी/विद्यार्थींनीना शालेय दप्तराचे वाटप केले.
कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तावडे मॅडम, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत सदस्य सतिश जाधव, श्री,हजारे,व ग्रामस्थ तसेच मंडळाचे कार्यकर्ते शंकर जाधव, किशोर जाधव हे उपस्थित होते.मंडळातील सदस्यांनी त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.












