माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ सायन्स कनेडी,बालमंदिर कनेडी प्रशालेत ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश सावंत (अध्यक्ष,क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई) यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी) च्या विद्यार्थ्यांनी कवायत संचालनाद्वारे राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यी गुणदर्शन कार्यक्रम बालमंदिर विभाग व माध्यमिक विभाग (देशभक्तीपर नृत्य),उच्च माध्यमिक विभाग ( विज्ञान चांद्रयान थीम,स्टोरी ऑफ इंडिया आर्मी नृत्य,आकर्षक मानवी मनोरे) सादरीकरण केले, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तींच्या आर्थिक निधीतून रोख रक्कमेची बक्षीसे वितरित करण्यात आली.

सदर कार्यक्रमासाठी आर.एच.सावंत,(शालेय समिती चेअरमन),व्ही.बी.सावंत,संजय सावंत,नाना सावंत,प्रभाकर चांदोस्कर,बावतीस घोन्सालवीस,सर्व संस्था पदाधिकारी व शालेय समिती सदस्य, तसेच मंगेश सावंत,अरुण सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी,पर्यवेक्षक बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!