उद्या भरणार वैभववाडीचा आठवडा बाजार

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या एकता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा एकता मेळावा सालाबादप्रमाणे बुधवार दि.३१ जानेवारी रोजी असल्याने वैभववाडी तालुक्याचा आठवडा बाजार उद्या मंगळवार ३० जानेवारी रोजी भरविण्यात येणार आहे. याची सर्व व्यापारी तसेच ग्राहकांनी नोंद घ्यावी. तसेच बुधवार दि.३१ जानेवारी रोजी संपुर्ण वैभववाडी बाजारपेठ बंद राहील. असे आवाहन वैभववाडी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!