उद्या मंगळवारी भव्य सत्यनारायण पुजेचे आयोजन
महिला फुगडीचा विशेष कार्यक्रम
तळेरे (स्वप्निल तांबे) : दरवर्षी प्रमाणे रिक्षा संघटना तळेरे च्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापुजेचे मंगळवार 30 जानेवारी राेजी आयाेजन करण्यात आले असून त्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम हाेणार आहेत.
सकाळी 9 वाजता श्री सत्यनारायण महापूजा त्यानंतर 10 वाजता पाटगाव येथील श्री पावनादेवी ढोल ताशा पथकचे ढोलवादन होणार असून 10.30 वाजता आरती व तीर्थप्रसाद होणार आहे. सकाळी ठीक 11 वाजता श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा संतोष तळेकर यांचे भजन होणार आहे.त्यानंतर दुपारी 1 ते 3 महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर महिलांचे हळदी कुंकु, दुपारी 3.30 वाजता श्री गवळदेव फुगडी मंडळ बोर्डवे-सुंदरवाडी आणि श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ -भैरववाडी येथील फुगाडीचा जुगलबंदी सामना रासिकन अनुभवता येणार आहे.सायं. ६ वा.सत्कार व पारितोषिक वितरण (पंचक्रोशीतील माध्य, विद्यालयांतील दहावीचे गुणवंत विद्याथ्यांना पारितोषिक वितरण), त्यानंतर जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ, तळेरे-वाघाचीवाडी (बुवा राजू वळंजू) यांचे संगीत भजन,रात्री ८ वा.श्री ब्राम्हणदेव महिला मंडळ नाद-भोळेवाडी यांचा समईनृत्य कार्यक्रम,रात्रौ ९ वा.पारंपारिक डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा नंदादीप बंजारे विरुद्ध बुवा रामदास कासले मालाड-मुंबई यांच्यात हाेणार आहे.
रिक्षा संघटना वर्धापन दिन सत्यनारायण महापुजा कार्यक्रम समयी तळेरे येथील जमदाडे कॉम्प्लेक्स समोर भव्य मंडप उभारण्यात आला असून कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरु आहे.तसेच सत्यनाराय महापुजाचा तीर्थप्रसाद,महाप्रसादआणि विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.












