ब्लॅक बेल्ट परीक्षेत कनेडी हायस्कूलचे सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशालेत वार शनिवार व रविवार दिनांक-२७/०१/२०२४ आणि २८ /०१/२०२४ रोजी ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले.

सदर परीक्षा “INDO-RYO KARATE -DO & SPORT’S ASSOCIATION, India संस्थेमार्फत बॅल्क बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष रविंद्र खामकर,परिक्षेचे परिक्षक सचिन महाडिक,गणेश हटकर,रंजन चव्हाण,शिक्षीका स्नेहा रहाट यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत उच्च माध्यमिक विभागातील कु. सृष्टी जयवंत गुडेकर, कु.साक्षी शामसुंदर सावंत, कु. हेमांगी सुधाकर घाडीगांवकर,कु.प्रणाली प्रविण कांदळकर,कु.करिना किशोर सावंत,यांनी सुयश संपादन केले,या सर्व विद्यार्थ्यांनी इ.५ वी पासून कराटे प्रशिक्षक साई प्रसाद दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले व घेत आहेत.

ब्लॅक बेल्ट ही कराटे मधील सर्वात महत्वाची परीक्षा समजली जाते,ही परीक्षा पास होण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी, मानसिक तयारी व सामाजिक दृष्टीकोन यांची जाणिव असावी लागते, आणि त्याचे फलित म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेले सुयश

या नेत्रदिपक सुयशाबद्दल सतीश सावंत (अध्यक्ष,क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई)आर.एच.सावंत,(शालेय समिती चेअरमन),संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी,पर्यवेक्षक बयाजी बुराण,तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!