खारेपाटण नाजिक नडगिवे घाटात कंटेनर पलटी

चालक जखमी ,लाखोंचे नुकसान

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे बांबरवाडी येथील अवघड वळणावर अवजड वाहन चालकाचा कंटेनर वरील ताबा सुटून कंटेनर पलटी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला.

हा अपघात सकाळी ११.३० च्या सुमारास नडगीवे घाटीत घडला.गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या जाणाऱ्या या कंटनेर अपघातात कंटेनर चे मोठे नुकसान झाले असून सदर अपघातात वाहन चालकाला देखील दुखापत झाली असून त्याला जवळच्या खारेपाटण प्रा.आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.अपघाताची बातमी मिळताच खारेपाटण दुरक्षेत्र चे पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहिते यांनी घटनास्थळी भेट घेऊन अपघाताची पाहणी केली.तर अपघाताचा अधिक तपास खारेपाटण पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!