संघटनेचा बुलंद आवाज संतोष सावंत यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे आयोजित केलेल्या नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य आहे. ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचा बुलंद आवाज संतोष सावंत यांच्या संकल्पनेतून ही संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे, ही बाब कौतुकास्पद असून रिक्षा चालक व मालकांनी संघटित राहिले पाहिजे. चालक व मालक संघटनेचे प्रलंबित प्रश्न व समस्या आहेत, त्या आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून सोडविण्यात येतील संघटनेच्या पाठिशी भाजप पक्ष नेहमीच खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपचे उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत दिली.
कणकवली शहर ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या उड्डाणपुलाखालील मैदानात नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन संदेश सावंत व राष्ट्रावादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबीद नाईक यांच्या हस्ते झाले, यावेळी रिक्षा चालक-मालक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अण्णा कोदे, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, संघटनेचे शहराध्यक्ष संतोष सावंत, संजय मालंडकर, कलमठचे उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, समीर प्रभुगावकर, निखिल आचरेकर, दादा पावसकर, भरत तळवडेकर, बाळा वराडकर, राजू चिंदरकर आदी उपस्थित होते.
आबीद नाईक म्हणाले, रिक्षा चालक व मालक संघटनेला माझे नेहमीच सहकार्य असणार आहे. आमदार नीतेश राणे यांनी शहरातील खेळाडूंसाठी उड्डाणपुलाखाली मैदान उपलब्ध करून दिले आहे. याचा खेळाडूंनी सरावकरीत उपयोग केले पाहिजे, संघटनेतर्फे अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. संघटनेचे समाजोपयोगी उपक्रम चांगले असून यापुढील काळात विविध उपक्रम राबवा, त्याला आपले नेहमीच सहकार्य असेल. शहर व तालुक्यातील रिक्षा चालक व मालकांचे एकजूट आहे, ही एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. आरंभी मान्यवरांचे स्वागत संघटनेतर्फे करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळू वालावलकर यांनी केले. स्पर्धेदरम्यान, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी भेट देत आयोजकाचे कौतूक करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले आहेत.













