जिल्हा न्यायाधीश डॉ. सानिका जोशी यांनी सुनावली शिक्षा
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
मागील वर्षभरात 11 आरोपींचा गुन्हा तोडकरी यांच्या युक्तिवादामुळे झाला सिद्ध
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 13 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिला गर्भार केल्याच्या गुन्ह्यातील 51 वर्षीय लिंगपिसाट गुन्हेगार प्रमोद मधुकर परब ( रा. पडवे, मधलीवाडी ) याला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी 20 वर्ष सक्तमजुरी सह 20 हजार दंडाची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी या खटल्यात केलेला अत्यंत यशस्वी युक्तिवाद आरोपी प्रमोद परब ला गुन्हा शाबीत करण्यास कारणीभूत ठरला. तर या गुन्ह्याचा यशस्वी तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी केला होता. मानवतेला काळिमा फासणाऱ्या नराधम प्रमोद परब याला आता पुढील आयुष्य जेलमध्ये घालवावे लागणार आहे. 13 वर्षीय पीडित बालिकेवर नराधम प्रमोद परब याने 12 मार्च 2021 आणि 16 एप्रिल 2021 रोजी पीडितेच्या घरात जबरदस्तीने बलात्कार केला होता. व घडलेली घटना कोणास ना सांगण्याची धमकी दिली होती.पीडित बलिकेची मासिक पाळी न आल्यामुळे तिला डॉक्टरकडे नेल्यावर ती दोन महिन्यांची गर्भवती आसल्याचे समजून आले होते. त्यानंतर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात आरोपी प्रमोद मधुकर परब विरोधात दाखल फिर्यादीनुसार आयपीसी 376 (1), 376 (2), एफ, जे, एन, 376 ( 3) पोक्सो ऍक्ट कलम 4,6, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांच्या समोर झाली.अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी 11 साक्षीदार या गुन्ह्यात तपासले. पीडित बालिकेची , पीडितेची आई वडील तसेच चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष यात महत्वाची ठरली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी कौशल्य पणाला लावत आरोपी प्रमोद परब या नराधमाचा गुन्हा साबीत करण्यासाठी घेतलेली मेहनत फळाला आली असून आरोपी प्रमोद परब याला आता 20 वर्षे जेलमध्ये घालवावी लागणार आहेत.दरम्यान मागील वर्षभरात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांच्या यशस्वी युक्तिवादामुळे 11 आरोपींचा गुन्हा शाबीत झाला आहे. बलात्कार, पोक्सो, खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील 11 आरोपींचा गुन्हा सिद्ध झाला असून त्यांना शिक्षाही झाली आहे.












