वकील दाम्पत्य हत्येचा देवगड तालुका बार असोसिएशन ने केला निषेध

देवगड (प्रतिनिधी) : राहुरी अहमदनगर येथे वकिली व्यवसाय करणा-या दांपत्याच्या निघृण हत्येचा देवगड तालुकाबार असोसिएशनच्यावतीने निषेध करण्यात आला.सदर हत्याकांडाचा सखोल तपास होवुन सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी व त्यांचेवर पुढील कायदेशिर कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी सर्व वकील सदस्यांनी निवेदनाव्दारे देवगड तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. दिवसेंदिवस राज्यात वकीलांवर हल्ले करणे,धमकाविणे त्रास देणे असे प्रकार वाढत चालले आहेत. आढावा व वकील दांपत्यांच्या झालेल्या निघृण हत्येमुळे त्यांची दाहकता अधिक प्रकर्षाने समोर आलेली आहे. यासाठी वकीलांच्या संरक्षणाकरीता ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तात्काळरित्या लागू करणे आता अत्यावश्यक बनलेले आहे व सदर कायदयाची तात्काळ अंमलबजावणी सुरु झाल्यास वकीलांच्या मनात निर्माण झालेली भिती दूर होवुन त्यांना व्यवसाय करताना संरक्षणाची हमी मिळणारी आहे. तरी प्रस्तुत वकील संरक्षण कायदा तात्काळ लागू करणेत यावा व त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करणेकरिता आपलेमार्फत महाराष्ट्र शासनास कळविणेत यावे असे निवेदन देवगड तहसिलदार यांना देवगड तालुकाबार असोसिएशनच्यावतीने देण्यात आले. यावेळी ॲड. देवानंद गोरे, ॲड. सिध्देश आचरेकर, ॲड. गिरीश भिडे, ॲड. श्यामसुंदर जोशी, ॲड. अन्वी कुलकर्णी, ॲड. संगीता कालेकर, ॲड. लिमये, ॲड. लोके, ॲड. खोबरेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!