एपीआय विकास बडवे यांनी स्वीकारला बांदा पोलीस ठाण्याचा कार्यभार

बांदा (प्रतिनिधी) : बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांची ओरोस येथे सागरी सुरक्षा दलात बदली झाली. त्यांच्या जागी कोल्हापूर सायबर क्राईम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी आज सायंकाळी उशिरा पदभार स्वीकारला.

सहाय्यक निरीक्षक काळे हे अडीच वर्षे बांदा येथे कार्यरत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केलेत. बांदा पोलीस ठाण्याच्या वतीने कर्मचाऱ्यांनी श्री काळे यांना निरोप दिला.

error: Content is protected !!