खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा खारेपाटण यांच्या वतीने नुकतीच गुंतवणूक कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळे करिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया,शाखा खारेपाटणच्या मॅनेजर योगिता ढाणे मॅडम तसेच एसबीआय लाइफचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सीनियर एरिया हेड केदार खानविलकर व एसबीआय लाइफच्या बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर शितल गव्हाणकर मॅडम आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकामध्ये गुंतवणुकीबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खारेपाटण शाखा अधिकारी श्रीम.योगिता ढाणे मॅडम यांनी गुंतवणुकीविषयी छान मार्गदर्शन करतं आजची गुंतवणूक ही तुमच्या उद्याची काळाची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला खारेपाटण कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए .डी. कांबळे,प्रशालेचे पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षक सचिन शेट्ये यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक संतोष राऊत यांनी केले.














