खारेपाटण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने यश कंप्युटर अकॅडमी खारेपाटण mkcl यांच्या वतीने नुकतीच शालेय विद्यार्थ्यांकरिता विभाग स्तरीय प्रशमंजुषा e test स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं १ येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घघाटन सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
या प्रसंगी खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर , शिवप्रेमी ऋषिकेश जाधव, पदवीधर शिक्षक संजय राऊळ, अर्चना तळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये खारेपाटण विभागातील शेठ न म विद्यालय खारेपाटण आणि ज्युनियर कॉलेज खारेपाटण मधील सुमारे ५०० विद्यार्थी तसेच रामेश्वरनगर जि.प. शाळा येथील विद्यार्थी, तसेच शेर्पे माध्यमिक वियालय, वारर्गाव माध्यमिक विद्यालय, केळवली माध्यमिक विद्यालय, तीथवली माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल नडगिवे आणि जि.प.केंद्र शाळा खारेपाटण येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुमारे ११२५ विद्यार्थ्यांनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शाळाचे मुख्याध्यापक, सह शिक्षक, तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. या प्रश्न मंजुषा स्पर्धेचा निकाल शाळा निहाय दिनांक २१ रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. तसेच प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमांकाचा विशेष प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार असल्याचे मंगेश गुरव यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे आरध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि कार्य तसेच त्यांचे चरित्र प्रश्नमंजुषा स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थ्या पर्यंत पोहचविन्याचे काम यश कॉम्प्युटर अकॅडमी खारेपाटण च्या वतीने करण्यात येत आहे.हा उपक्रम स्तुत्य असल्याचे खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याद्द्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी यावेळी सांगितले.