मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बिळवस येथील सुबोध राजाराम फणसे हा कर्करोगाने त्रस्त असून त्याला ऑपरेशन साठी आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील दात्यांनी मदत करण्याचे आवाहन सुबोध फणसे याने केले आहे. सुबोध फणसे याला बारा वर्षांपूर्वी किडनी कॅन्सर या आजाराचे निदान झाले होते. २०११मध्ये त्याची तीन ऑपरेशन सुद्धा झाली आहेत. या ऑपरेशन साठी त्याच्याजवळ असलेले सर्व पैसे खर्च झाले असून आता पुन्हा २०१८ पासून त्याच्यावर नव्याने उपचार चालू आहेत. सुबोध अनाथ असून त्याचे आई-वडील सुद्धा मयत आहेत. त्याचप्रमाणे तो शारीरिक अपंग सुद्धा आहे. सरकारी योजनेतून उपचारासाठी त्याला खर्च मिळतो परंतु उपचार घेण्यासाठी प्रवास खर्च, औषधोपचार यासाठी पैसे लागतात. २०११ सालापासून फणसे याने कोणाचीही मदत न घेता आपले उपचार केले आहेत. परंतु आता परिस्थिती पुढे तो हरला असून मुंबई येथील टाटा हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मालवण शाखेमध्ये त्याचे बचत खाते असून सदर बचत खात्याचा अकाउंट नंबर ००९४००००००२१६८३ असून आयएफएससी कोड SIDC०००१००९ असा आहे.सुबोध याचा मोबाइल नंबर ९४२२२३४५४४ असा आहे.
समाजामध्ये आज अनेक दाते आहेत जे वेळोवेळी अशा प्रकारच्या गरीब रुग्णांसाठी धावून येत असतात. अशा अनेक दात्यांच्या मदतीतून फणसे याला औषधोपचार करणे सोपे जाणार आहे. एका अपंग व्यक्तीला जीवन जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी समाजातील दात्यांनी सुबोध फणसे यांना मदत करणे आवश्यक आहे.