कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा हा शेतकऱ्यांचा आवाज अर्थमंत्री अजित लवार यांच्या पर्यंत आम्ही पोचवला असून अर्थमंत्री अजित पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही हा प्रश्न उचलून धरला असून कृषिमंत्री मुंडे तसेच संबंधित मंत्र्यांची एकत्रित बैठक येत्या मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. येत्या अधिवेशनात काजू उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव ची खुशखबर मिळण्याची घोषणा होईल असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. काजू उत्पादन खर्च 129 रुपये येत असून बाजारभाव 100 रुपये मिळतोय. काजूबी ला 200 रु हमीभाव मिळावा ही मागणी अर्थमंत्री अजित पवार यांनि प्रथमदर्शनी मान्य केली आहे. कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. बाजारभाव आणि मिळणारा हमीभाव यातील फरकाची रक्कम शासनाने भावांतर योजनेत द्या अशी मागणी राज्य सरकारकडे आहे.
काजूबी भावांतर पद्धतीने हमीभाव मिळावा – प्रमोद जठार












