गावच्या विकासामध्ये बचत गटाच्या महिलांचा सक्रिय सहभाग – संजना आग्रे
फोंडाघाट (प्रतिनिधी) : जि.प.रत्नागिरी जिल्ह्यातील आणि देवरुख-संगमेश्वर पंचायत समिती मधील निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत ” धामणी ” गावातील बचत गटांसाठी विविध गावातील कार्य आणि व्यवसाय- प्रशिक्षण दौऱ्यांतर्गत महिला-अधिकाऱ्यांनी, फोंडाघाट ग्रामपंचायतला भेट दिली. आणि फोंडा गाव पातळीवरील बचत गटाचे काम-प्रगती- लघुउद्योग- व्यवसाय यांची माहिती घेतली.
यावेळी धामणे गावचे सरपंच संतोष कानेकर, उपसरपंच संगम पवार, ग्रामसेवक अधिकारी शेखर जाधव, प्राजक्ता लिंगायत, प्रणिता घाणेकर यांचे सह फोंडाघाट ग्राम पंचायत सरपंच सौ संजना आग्रे,उपसरपंच तन्वी मोदी यांचे सह बचत गटाच्या बहुसंख्य माहिती महिला उपस्थित होत्या यावेळी धामणी गावच्या पाहुण्यांचे फोंडावासियातर्फे यथोचित स्वागत करण्यात आले. ग्रा. वि . अधिकारी विलास कोलते यांनी, गावात बचत गटांमध्ये सुरू असलेले व्यवसाय,प्रशिक्षण, आणि गटांचा गाव विकासातील स्तुत्य सहभाग विशद केला. तर संतोष जोईल यांनी काव्यमय मार्गदर्शनातून स्त्री सबलीकरण आणि त्यांचा खंबीर सहभाग व गावची वैशिष्ट्ये, व्यापारी महत्व, उतार पेठ,ऐतिहासिक वारसा याबद्दल उदाहरणे दिली. सौ आग्रे आणि सौ. मोदी यांनीही बचत गटांना मिळणारे प्रोत्साहन आणि त्यांचेकडून जनतेच्या अपेक्षा आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या .
फोंडाघाट मधील अपूर्व स्वागत आणि मिळालेल्या माहितीमुळे आमचा अभ्यास आणि बचत गटातील महिलांना त्यांच्या व्यवसायात नक्कीच उपयोग होईल,असा विश्वास त्यांनी धामणी गावचे सरपंच संतोष कानेकर आणि ग्रा.वि.अधिकारी शेखर जाधव यांनी व्यक्त केल राजेश शिरोडकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.त्यानंतर आलेल्या धामणी बचत गटाच्या महिलांनी चंद्रराज लोणचे व्यवसाय, राजा ठाकूर यांचे गोपालन खत निर्मिती व्यवसाय, हिंदळेकर यांचे मातीची भांडी व्यवसाय यांना भेट देऊन समाधान व्यक्त केले.













