वाकड्या तोंडाच्या विनायक राऊत ना घरी बसवण्याची वेळ – प्रमोद जठार

ठाकरे राऊत जोडीला अरबी समुद्रात बुडवणार

कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे हे मारून मुटकून झालेले राजकारणी आहेत. उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांनी कोकणचा विकासाला खो घातला. औद्योगिक प्रकल्पाला विरोध करून ठाकरे राऊत जोडीने कोकणच्या बेरोजगारांना मिळणारा रोजगार बुडवला असून आगामी निवडणुकीत ठाकरे राऊत जोडीला अरबी समुद्रात येथील जनता बुडवणार अशी टीका भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली. वाकड्या तोंडाचा खासदार विनायक राऊत आणि उद्धव ठाकरे प्रकल्पाला विरोध करताना स्वतःला विश्वासात घ्या म्हणतात.पण विश्वासात घ्या म्हणजे आम्हाला पैसे द्या , आमची आर्थिक मागणी पूर्ण करा अशी मागणी ठाकरे राऊत यांची असल्याचा आरोपही जठार यांनी केला. 2024 मध्ये केंद्रात मोदी सरकार पुन्हा येणार हे उघड आहे. विकास करण्यासाठी तळकोकणात तेवढ्याच ताकदीचा खासदार असणे गरजेचे आहे. त्यामुळे ह्या वाकड्या तोंडाच्या विनायक राऊत ना लोकसभा निवडणुकीत घरी बसवा असा हल्लाबोल जठार यांनी केला.

error: Content is protected !!