श्री गांगोमाऊली क्रीडा मंडळ, फोंडाघाटच्या तिसऱ्या वर्षी, वाघोबा चषकाचा श्री साई समर्थ स्पोर्ट्स विजेता !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या पर्वतराजीमध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यात, श्री गांगोमाऊली क्रीडा मंडळातर्फे, सलग तिसऱ्या वर्षी, क्रिकेट स्पर्धेत वाघोबा चषक श्री साई समर्थ स्पोर्ट्स यांनी पटकावला. तर उपविजेता एस. पी स्पोर्ट्स आणि तृतीय क्रमांक महापुरुष इलेव्हन या संघांनी मिळविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे,माजी सभापती मनोज रावराणे, संतोष कानडे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद लाड, पवन भालेकर, व्हाईस चेअरमन श्रद्धा सावंत, यांचे उपस्थितीत दीप प्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवुन तसेच मंडळाचा स्पोर्ट्सवर ध्वज उभारुन कऱण्यात आला. यावेळी उपस्थितानी राष्ट्रगीत म्हटले. पंचक्रोशीतील आठ संघांमध्ये रंगलेले या स्पर्धेचे बक्षीस वितरण बबन हळदिवे, गणेश हळदिवे, विश्वनाथ जाधव, भालचंद्र राणे ,समीर भालेकर, ग्रामसेवक बाळा कुबल, संजय सावंत ,विजय पाताडे, संतोष जोईल इत्यादी मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. मॅन ऑफ द सिरीज- संकेत जाधव, उत्कृष्ट फलंदाज- सुरज गोसावी, उत्कृष्ट गोलंदाज- आबा जोईल यांनाही मंडळाचे अध्यक्ष संदीप जोईल आणि मान्यवरांचे हस्ते चषक देऊन गौरवण्यात आले. मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक आणि नियोजनबद्ध स्पर्धा पार पाडली. याचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!