चौके (अमोल गोसावी) : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील २,२०८ शाळांमध्ये व ६५ गट साधन केंद्रामध्ये ICT प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कोकण विभागामध्ये समावेशक सर्व शाळा व गटसधान केंद्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ दि २४/०१/२०२४ रोजी मुबंई मध्ये पार पडला. सदर प्रशिक्षणाचा कार्यक्रम एकदिवसीय असल्याने सर्व कोकण विभागातील जिल्ह्यानुसार नियुक्त करण्यात आलेले सर्व प्रशिक्षक तसेच कोकण विभाग प्रमुख, जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक यांच्या उपस्तिथीत पार पडला. कोंकण विभागातील ४१४ शाळा व ०९ गट संसाधन केंद्रामध्ये ICT संगणक प्रयोग शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पाच्या कोंकण विभागाच्या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी श्री. निनाद नागवे सर (कॉम्पुटर प्रोग्रामर), रायगड जिल्हा परिषद, रुपाली कोंडावर मॅडम (कॉम्पुटर प्रोग्रामर),बीएमसी शिक्षण विभाग कार्यक्रम सहाय्यक पूनम निकम मॅडम, बीएमसी शिक्षण विभाग यांच्या उपस्थितीत संगणक प्रकल्प कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. सदरचा प्रकल्प राज्यातील एकूण २,२०१ शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व प्रशिक्षकांची शालेयस्तरावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुलांना शालेय स्तरावरून संगणक प्रशिक्षण मिळून त्यांना भविष्यात कौश्याल्यावर आधारित रोजगार उपलब्ध होण्याकरिता सदर प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. तसेच मुलांना संगणक कौशल्यात पारंगत करणे, आधुनिकतेविषयी जागृती विकसित करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. सदर प्रकल्पाच्या कोकण विभागातील ICT संगणक प्रशिक्षण कार्यशाळेत २०० हुन अधिक उपस्थित प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ,राज्य प्रकल्प संचालक प्रदीप कुमार डांगे सर तसेच जिल्हा शिक्षण विभागातील सर्व शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात येत आहे.
कोंकण विभागातील ४१४ शाळा व ०९ गट संसाधन केंद्रामध्ये ICT संगणक प्रयोग शाळांमध्ये प्रशिक्षण राबविण्यास सुरुवात.












