भालचंद्र महाराज संस्थान व नमो भालचंद्राय यांच्यावतीने आयोजन…!
कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज यांच्या 120 व्या जन्मोत्सवानिमित्त परमसंह भालचंद्र महाराज संस्थान व नमो भालचंद्राय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव घरगुती सजावट घेण्यात आली. यात यशवंत उर्फ विनू महाडिक यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
हर्षदा म्हाडगुत यांनी दुसरा तर विठ्ठल गाड यांनी तिसरा क्रमांक मिळवला. मनोज कोदे चौथा तर नंदू वाळके यांनी पाचवा क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक पालय डिचोलकर, गंधार निखार्गे, शुभांगी उबाळे यांनी पटकाविले. या स्पर्धेत 16 जणांनी सहभाग घेतला होता.परीक्षक प्रवीण चिंदरकर व हनुमंत ताबंट यांनी केले.भालचंद्र महाराज यांच्या जन्मदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते विजेत्या रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थानाचे खजिनदार दादा नार्वेकर, विश्वस्त निवृत्ती धडाम, प्रसाद अंधारी, नागेश मुसळे, उमेश वाळके,अनिल हळदिवे,अँड. प्रवीण पारकर, काशिनाथ कसालकर, व्यवस्थापक विजय केळुसकर, राजन पारकर,संतोष पुजारे,महेंद्र अंधारी, हनुमंत इंगळे, विजय इंगळे,हर्षद अंधारी,संदीप अंधारी,सोहम वाळके,प्रसन्ना देसाई, अमित सापळे, महेश कोदे,चेतन अंधारी आदी उपस्थित होते. भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित प. पू. भालचंद्र महाराज संस्थान व नमो भालचंद्रय ग्रुप यांच्यावतीने गेली 4 वर्षांपासून स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. यंदाही नागरिकांनी आपल्या घरासभवताली सजावट केली होती. ही साजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.याशिवाय घरासमोर भालचंद्र महाराज यांचे देखावे तयार केले होते. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती.












