पतीकडून पत्नीवर ऍसिड हल्ला

कणकवली (प्रतिनिधी) : पत्नीवरील संशयातून पती आरोपी तुकाराम गंगाराम कदम ( वय 50 वर्षे, रा. कासारडे, कदमवाडी ) याने आपल्या पत्नीवर ऍसिड हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी तुकाराम कदम व त्याच्या पत्नीचा हा दुसरा विवाह असून लग्नाला सुमारे 9 वर्षे झाली आहेत. पीडित पत्नीला संशय घेऊन दारूच्या नशेत तुकाराम शिवीगाळ आणि मारहाण करत असे. 27 जानेवारी 2024 रोजी पुणे येथे आरोपी तुकाराम आपल्या पत्नीसह आपल्या मुलीकडे गेला होता.पुणे येथे तुकाराम याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली.पत्नीच्या चेहऱ्यावर बाटलीतील ऍसिड फेकले. या ऍसिड हल्ल्यात तुकाराम याच्या पत्नीच्या गळ्याला, चेहऱ्याला, छातीवर ऍसिड ने जखम झाली. त्यानंतर तुकाराम ची पत्नी त्या रात्रीच पुणे येथून घरी कासार्डे येथे घरी परत आली. वैभववाडी येथील सरकारी रुग्णालयात तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. अधिक उपचाराकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालय व नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले आहे. तुकाराम याच्या पत्नीच्या फिर्यादीनुसार आरोपी तुकाराम विरोधात कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा कलम 498 ( अ ), आयपीसी 326 ( अ ), 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.अधिक तपास पीएसआय अनिल हाडळ करत आहेत.

error: Content is protected !!