कणकवली (प्रतिनिधी) : एलआयसी कणकवली शाखेचे विमा प्रतिनिधी अमोल केतकर याना विमा क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा एमडीआरटी पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कॅलेंडर इयरमधील दमदार कामगिरीच्या जोरावर अमोल केतकर यांनी एमडीआरटी ( मिलियन डॉलर राउंड टेबल ) पुरस्काराला स्वकष्टाने गवसणी घातली आहे. केतकर यांनी 32 लाख 50 हजार फर्स्ट इअर प्रीमियम आणि कमिशन बेसवर अमोल यांनी एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. अमोल केतकर हे गेली 20 वर्षे एलआयसी विमा क्षेत्रात कार्यरत असून अत्यंत तत्पर आणि विनम्र सेवेने त्यांनी 1 हजार 200 हून अधिक ग्राहकांशी आपले दृढ संबंध निर्माण केले आहेत. एलआयसी सह हेल्थ इन्शुरन्स आणि मोटर इन्शुरन्स विक्री आणि सेवाही केतकर देतात. केवळ नवीन विमा पॉलिसी विक्रीच नव्हे तर विमा पॉलिसी विक्री पश्चत ग्राहकाच्या गरजेनुसार तात्काळ सेवा देण्यात त्यांचा हातखंडा आहे. पॉलिसी कुठेही घेतली तरी सेवा केतकर इन्शुरन्स सर्व्हिस मध्ये हे ब्रीदवाक्य घेऊन ते सर्व विमाग्राहकांना सेवा देत आहेत. विमा व्यवसाय क्षेत्रात अमोल केतकर यांना त्यांची सुविद्य पत्नी सौ. अमृता यांची समर्थ साथ आहे. शाखाधिकारी दशरथ कुंभार, सहाय्यक शाखाधिकारी ओंकार शिर्सेकर, विकास अधिकारी एस.ए. पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल केतकर यांनी हे यश प्राप्त केले असून याबद्दल केतकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अमोल केतकर याना विमा क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा एम डी आर टी पुरस्कार प्राप्त











