केसांनी गळा कापणारा वाडीचा दिवटा व कणकवलीच्या पावट्या ला उद्धव ठाकरेंच्या दौऱ्या मुळे पोटात भीतीचा सुळ – संदीप सरवणकर.

वैभववाडी (प्रतिनिधी): आक्रमता, हिंसा,भीती, द्वेष,राग आवेश ह्या विकृती घाबरलेल्या व अस्थिर मानसिकतेच्या प्रतिकृती आहेत. म्हणून पक्षां तर किंवा पक्ष फोडी आणि त्यासाठीच का इडी, सीबीआय चे देश भर धाडी आणि शंकरचार्याची कुचेष्टा ही देखील कुत्सीचांचे तोंडी चालू आहेत. देशातील काय किंवा आपल्या जिल्ह्यातील राजकीय अवस्था ही ,थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत. सत्ताधारी आपल्या होमपिच ठाणे जिल्ह्यात ,पोलिस ठाण्यात इनडोअर गुन्हे स्पर्धा भरवित आहेत.मग ते दादर असो हील लाईन पो ठाणे असो, त्याचप्रमाणे बिहार असो का झारखंड प्रत्येकाला आपल्या सत्तेचा वरचस्मा रहावा हेच साध्य दिसत आहे.त्या साठी कोणत्याही थराला जायचे याची राजकीय चढा ओढ चालू आहे.अबकी बार चारसो फार हा तर फुसका बार आहे हे भाजपच्या नेत्याचे ही लक्षात आले आहे. ई वी एम चा वरद हस्त नाही राहिला तर आपले काय खरे नाही ही मुळभिती आहे. म्हणून, इंडिया आघाडी मोडावी किंबहुना प्रश्न विचारायला विरोधक आपल्याला नसावे. म्हणजे सत्तेला उत्तर दायित्व नको ,मग उन्माद आणि अराजकता मजविता येते, हे महाराष्ट्र व चंदीगड येथे प्रशासकीय न्याय दानातून यांनी सिध्द केलेले आहे. म्हणून, उद्धव साहेबांचा सिंधुदुर्ग दौरा केसाने गळा कापणाऱ्या दिवट्या ला काय कळणार, परंतु ,त्यांना मतदाराचा उस्फुर्त पाठिंबा बघून, तरी आपल्या मित्र पक्षाचा टेंबा दिवट्या नी मिरववा की मिरवू नये हे त्याचे त्यांनी ठरवावे . जनतेनी मात्र यांना जागा दाखवण्याचे ठरवले आहे. आणि उद्धव साहेबाचा दौरा हे त्यांचे कोकण भूमी वरील प्रेमाचे द्योतक आहे. परंतु दिवट्या पावट्याना ते घातक आहे. हे वाटणे सहाजिकच आहे.

error: Content is protected !!