फोंडाघाट (प्रतिनिधी): वांगणकर फिटनेस आणि कोकण सिंधू. पावर लिफ्टिंग,संलग्न महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित पुरुष महिला भव्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२४ देवगड येथे उत्साहात संपन्न झाल्या. यामध्ये १०५ किलोग्रॅम सब ज्युनिअर मुले गटात फोंडाघाटच्या गौरव केदार रेवडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याला सुवर्णकार महेश घारे, माजी जि. प. सदस्या सौ. मनस्वी घारे आणि मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. त्याची राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आजवरच्या काळात पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत लक्षणीय यश मिळवणारा गौरव हा फोंडाघाट गावातील पहिलाच स्पर्धक असल्याने, पंचक्रोशीत त्याच्या यशाबद्दल कौतुक होत आहे.
*फोंडाघाटचा गौरव केदार रेवडेकर जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सबज्युनिअर गटात प्रथम *











