कणकवली(प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्यावर 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावलेल्या बॅनरवरील स्वराज्य रक्षक ही टॅगलाईन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. एकीकडे कुटील नीतीने फोडलेला पक्ष, साथ सोडून जाणारे खासदार आमदार असे चित्र असतानाही एकला लढो रे म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
स्वराज्य योद्धा ! ठाकरेंच्या स्वागताचे अतुल रावराणेंचे बॅनर ठरले लक्षवेधी












