राऊत यांच्या विरोधात शिंदे गट, भाजपाला उमेदवारही मिळत नाहीय
शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणेंचा टोला
कणकवली (प्रतिनिधी) : येत्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाला अजून उमेदवार मिळत नसून विरोधी उमेदवाराचा विनायक राऊत अडीच लाख मतांनी पराभव करणारच असा दृढ विश्वास शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी व्यक्त केला.एकीकडे खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झाली तरी दुसरीकडे शिंदे गट आणि भाजपात उमेदवारी वरून एकमत होत नाही आहे.शिंदे गट आणि भाजपाला राऊत यांच्याविरोधात उमेदवार मिळत नाहीय असा टोलाही अतुल रावराणे यांनी लगावला.












