कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कणकवलीत उद्या 4 फेब्रुवारी रोजी होणारी जाहीर सभा म्हणजे कखासदार विनायक राऊत यांच्या विजयी हॅट्ट्रिक ची नांदी असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार विनायक राऊत यांचे नाव निश्चित केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांत चैतन्य पसरले असून ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत असेही पारकर म्हणाले.
उद्भवजींची सभा म्हणजे राऊतांच्या खासदारकीच्या हॅट्ट्रिक ची नांदी – संदेश पारकर












