कनेडी प्रशालेतर्फे मका लागवड प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशालेतर्फे मका लागवड प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.

कनेडी प्रशालेतील उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी “बांधावरची शेती” उपक्रमा अंतर्गत प्रत्यक्ष शेतात मका लागवड शेतीचे धडे गिरवले. सांगवे गावचे प्रगतशील शेतकरी महेश सावंत यांच्या शेतात विद्यार्थ्यांनी मका लागवड केली. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे,आणि तो जगला पाहिजे या उदात्त हेतूने प्रशालेने या शिबीराचे आयोजन केले.

भारताची अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्राशी निगडीत आहे. भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखले जाते.त्यामुळे शेतीला अनन्यसाधारण असे महत्व आहे.

या शेती लागवड प्रशिक्षण स्थळी आर.एच.सावंत, (शालेय समिती चेअरमन), प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी,पर्यवेक्षक बयाजी बुराण, तसेच ६० विद्यार्थी व ०६ शेती कामगार उपस्थित होते.

error: Content is protected !!