असलदे-दिवाणसाणेवाडीत गवारेड्यांचा वावर

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे-दिवाणसाणेवाडी येथे दिवसा ढवळ्या गवा रेड्यांचा वावर पाहण्यास मिळत आहे. येथील जंगलमय परिसर असल्याने या गव रेड्यांचा सध्या परिसरात धुमाकूळ सुरू असून ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्याचबरोबर सध्या काजू व इतर पीके तयार होत असताना त्याचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच येथील नागरिकांची ही रहदारीची वाट असल्याने त्याना धोका संभवत असल्याने वनविभागाने याकडे लक्ष वेधून त्वरीत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!