देवगड (प्रतिनिधी) : मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्रमधील पोलीस उपअधिक्षक संतोष धनसिंग बर्गे हे सुदान देशातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या पोलीस सल्लागार पदी भारत सरकारतर्फे 14 महिन्यानंतर पुन्हा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सक्रीय झाले आहेत. 14 महिन्यामध्ये सुदान देशामध्ये तेथील पोलीसांना मार्गदर्शन करुन त्यांनी प्रबोधनात्मक काम केले आहे. कायदा सुव्यवस्थेची कश्या पध्दतीने जोखीम राखली पाहिजे. व प्रत्यक्ष प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जावून शांतता राखुन कायदा सुव्यवस्था त्यांनी जोपासून तेथील पोलीसांना मार्गदर्शन केले. 1 वर्षासाठी त्यांची भारत सरकारतर्फे संयुक्त राष्ट्र संघामध्ये पोलीस सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र बर्गे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबददल त्यांना दोन महिने अधिक काम करण्याची संधी संयुक्त राष्ट्र संघातर्फे देण्यात आली. 14 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी सुदान देशातील पोलीसांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करुन गुन्हे कमी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. सुदान देशामध्ये तेलाच्या खाणीवरुन सरकार विरुध्द जनता असे कायम संघर्ष होवून युध्द जन्य परिस्थिती असते या कठिण परिस्थितीमध्ये बर्गे यांनी तेथील आतंकवादी जनतेला क्षमविण्याचे काम केले आहे. अनेकवेळा त्यांना प्रतिकुल परिस्थितीला तेथे सामोरे जावे लागले. काहि त्यांच्या सोबत असलेले कर्मचारी व अधिकारी युध्द जन्य परिस्थितीमध्ये शहिदही झाले आहेत. मात्र बर्गे यांनी कसोटिने व आत्मियतेने त्या ठिकाणीशांतता राखण्याच्या दृष्टीकोनातून अथक प्रयत्न करुन युध्दजन्य परिस्थितीही क्षमविण्याचे त्यांनी काम केले आहे. ते नुकतेच 14 महिन्याच्या कालखंडानंतर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पुन्हा सक्रीय झाले आहेत. या पुर्वी त्यांनी रायगड,विजयदुर्ग् ( सिंधुदूर्ग) ठाणे,पुणे अश्या अनेक ठिकाणी त्यांनी पोलीस निरिक्षक पदावरती त्यांनी काम केले आहे. पुणे येथील सायबर गुन्हा शाखेमध्ये त्यांनी अतिशय क्लिट असे कठिण फसवणुकिचे गुन्हे उघड केले होते. व अनेक परदेशी नागरिकांना देखील त्यांनी अटक केले आहे. परदेशातही त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या पोलीस सल्लागार पदी केलेली कामगिरी वाखण्याजोग आहे. यामुळे त्यांना संयुक्तराष्ट्र संघाच्यावतीने विशेष पदक देवून त्यांचा गौरव देखील करण्यात आला आहे. पुन्हा आता महाराष्ट्र पोलीस दलामधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये उपअधिक्षक पदावरती रुजू झाले आहेत.
फोटो- संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने संतोष धनसिंग बर्गे यांना सन्मानित करताना.
14 महिन्याच्या कालखंडानंतर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये संतोष धनसिंग बर्गे पुन्हा सक्रीय












