सार्वजनिक बांधकाम विभाग चे ग्रामपंचायत आणि नागरिकांमध्ये संशयास्पद गैरसमज पसरवणारे पत्र ! ग्रामपंचायतीचे सडेतोड उत्तर —
फोंडाघाट (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ कडून ग्रामपंचायत फोंडा ला “अनधिकृत बांधकाम हटवणे” बद्दलच्या पत्राचा मोठा डिजिटल बोर्ड अज्ञातांकडून एस टी स्टँड आणि ग्रामपंचायत येथे रात्रीचे वेळी लावण्यात आला. सकाळी बाजारपेठेत या बोर्डवरून खळबळ माजली असून, घोळक्या -घोळक्या ने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया दिसून येत आहेत. खरोखरीच जर भ्रष्टाचार झाला असेल तर गेल्या ९ वर्षातील सर्व कामांची सखोल चौकशी करून, सत्य समोर आणा.आणि दोषीवर कारवाई तातडीने करावी अशी संतप्त मागणी व्यक्त होत आहे. मात्र सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत ने आपले अधिकार वापरून सदर बोर्ड कचरा गाडीतून जप्त करून कार्यालयाकडे नेले. याची दिवसभर फोंडाघाट पेठेमध्ये चर्चा होत आहे.
याबाबत सरपंच व ग्राम- विस्तार अधिकारी यांचे कडे चौकशी केली असता, सदरचे पत्र तारीख २६-०१-२४ रोजी ग्रामपंचायतीला प्राप्त झाले.यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाकडे बांधलेले चिरेबंदी कंपाऊंड बॉलचे बांधकाम रस्त्याच्या मध्यबिंदूपासून ३७ मीटर अंतर सोडलेले नसल्याने, अनधिकृत ठरवून ते पाडणे बद्दल कळविले आहे. मात्र सदर वॉल बाबत,तारीख ०५-०१-२४ रोजी ग्रामपंचायतने बांधकाम विभागास, हे बांधकाम ग्रामपंचायतच्या मालमत्तेचे संरक्षण आणि सुशोभीकरण हाच उद्देश असल्याचे नमूद करून, ४.५ मीटर वरील बांधकामामुळे रहदारीस कोणताही अडथळा येणार नसल्याचे कळविताना, आवश्यकता वाटल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र देऊन सहकार्य करण्यात येईल, असे पत्राने कळविले आहे. याबाबत आणि शेरवी तील संरक्षण भिंत आणि भ्रष्टाचाराबद्दल येथील नागरिक समीर सामंत यांनी तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत आणि बांधकाम विभाग संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करीत असताना, तारीख २६-०१-२४ च्या पत्रावर बांधकाम विभागाचे लेटरपॅड वापरलेले नाही. तारीख नाही. जावक क्रमांक नाही. त्यामुळे या विभागाच्या पत्राबद्दल साशंकता निर्माण होत आहे.
ग्रामस्थांनी सुद्धा ग्रामपंचायतीच्या परवानगीने, यापुढे बॅनर -पोस्टर अथवा बोर्ड लावावेत,असे आवाहन सरपंच संजना आग्रे यांनी यादरम्यान केले असून, विकास कामांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे….












