उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला उबाठा गटाला शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांचा धक्का

गावराई माजी ग्रा पं सदस्य अनंत फाले कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी केले स्वागत

कुडाळ (प्रतिनिधी) : गावराई गावचे उबाठाचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनंत फाले,जयमाला वेंगुर्लेकर,श्रीकृष्ण चिंदरकर यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर,योगेश उर्फ बंटी तुळसकर,महिला आघाडी तालुकाप्रमुख दीक्षा सावंत,सिद्धी शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण चिंदरकर यांच्या निवास्थानी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर,महिला आघाडी तालुकाप्रमुख दीक्षा सावंत यांनी नारळाचे रोप लावून त्याला पाणी घालून एक आगळा वेगळा संकल्प करून उबाठातील असंख्य कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यामध्ये प्रवेशकर्ते श्रीकृष्ण चिंदरकर,अनंत फाले,मारुती गावडे,जयमाला वेंगुर्लेकर,विनय शिरोडकर,अमित तावडे,वैभव वाईरकर,सिद्धेश राऊत,प्रकाश वायंगणकर,सखाराम मोरे,महेश जुवेकर,प्रसाद राऊत,विपल मांजरेकर,गणेश गावडे,विजय कदम,कल्पेश आयरे,संतोष काळे,भाई तावडे,प्रकाश परब,क्रांती चिंदरकर,सुषमा तावडे,पल्लवी चिंदरकर या सर्वांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी श्रीकृष्ण चिंदरकर यांना गावराई शिवसेना शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती,उपशाखाप्रमुख म्हणून मारुती गावडे,अनंत फाले यांना नियुक्ती देण्यात आली.महिला शाखाप्रमुख म्हणून जयमाला वेंगुर्लेकर यांची नियुक्ती देण्यात आली.तालुका प्रतिनिधी म्हणून विनय शिरोडकर यांची नियुक्ती देण्यात आली.या सर्व नियुक्त्या शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या.यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी कणकवली विधानसभा क्षेत्रप्रमुख संदेश पटेल,शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर,शिव भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब,रत्नाकर जोशी,ज्येष्ठ शिवसैनिक रामकृष्ण गडकरी मामा,पुंडलिक जोशी,राजू साधले आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी प्रवेशकर्त्यांचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले.

error: Content is protected !!