राष्ट्रीय दृष्टीहीन संघ शाखा कोकण यांच्यावतीने गोपुरी आश्रम येथे दृष्टीहीन दिवस साजरा

काम तुमचे प्रयत्न आमचे” या हाॅट्सअॅप ग्रुप तरंदळे तर्फे दृष्टीहीन बांधवाना ब्लॅंकेटचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र शाखा कोकण यांच्यावतीने गोपुरी आश्रम येथे दृष्टीहीन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हयातील 50 अंध बांधव उपस्थित होते. यावेळी अंध व्यक्तींनी फनीगेम्स बुद्धीबळ स्पर्धा, गाणी असे विविध सांधीक खेळ करून आनंद लुटला. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत डॉ.विद्याधर तायशेटे, मिळून सार्याजनी संघटनेच्या अध्यक्षा पूजा सावंत, अध्यक्ष बाबूराव गावडे, पुरुषोत्त सावंत, अमित सावंत, बाळू मेस्त्री, रुपेश आमडोसकर अनिल शिंगाडे उपस्थित होते.

यावेळी अमित सावंत तरंदळे यांच्या काम तुमचे प्रयत्न आमचे या ग्रुप तर्फे संदीप पुरुषोत्तम् सावंत मुंबई यांच्यातर्फे 50 नग ब्लॅन्केट,डॉ साै.भुरमाेळे यांच्याकडून जेवणाची व्यवस्था, समाजसेवक बाबू मेस्त्री यांनी नाश्ताची सोय,देवा रावले,अमित सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन आमच्या अंध बांधवांच्या कार्यक्रमाला सहकार्य केले. त्याबदल सर्वांचे प्रकाश वाघ यांनी आभार मानले.

यावेळी बोलताना अमित सावंत यांनी सतीश सावंत यांनी सरंदळे गावात दुधडेअरी स्थापन करण्यास आपणास मदत केळी. त्यामुळे गावातील तरुणांना रोजगार मिळाला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच काम तुमचे प्रयत्न या गुफतर्फे माझे सहकारी, दुस्त्याच्या मदतीला धावणारे बाळू मेस्त्री यांच्यामुळे आपणास काम करण्याची प्रेरणा मिळते.

यावेळी सतिश सावंत म्हणाले कि,दृष्टीहिन व्यक्तीची सेवा करणे म्हणजे परमेश्वराची सेवा करण्यासारखी आहे.राष्ट्रीय दृष्टीहिन महासंघ दृष्टीहिन व्यक्तींच्या हितासाठी जे काम करत आहे, ही बाब अतुलनीय आहे. दृष्टीहिन व्यक्तींना भिक्षागिरी करू नये याकरिता महासंघ त्यांचे मनपरिवर्तन करीत आहे. हा महासंघाला यापुढील जे सहकार्य लागेल, ते केले जाईल, अशी ग्वाही सतीश सावंत यांनी यावेळी बोलताना दिली.

डॉ. विद्याधर तायशेटे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दृष्टिहिन व्यक्तींसाठी राष्ट्रीय दृष्टिहिन महासंघ जे काम करीत आहेत. हे कौतुकास्पद आहे. अवयदान संघटनेचा मी जिल्हा समन्वयक असून या संघटनेच्या माध्यमातून आपल्या संघाला मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.आरंभी डॉ. हेलल केलर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील दृष्टिहीन व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!