सेवानिवृत्त सहाय्यक आगार व्यवस्थापक गणपत पवार यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे ( पायरवाडी ) येथील गणपत नारायण पवार ( वय 70 ) यांचे ब्रेन हॅमरेजमुळे 29 जानेवारी रोजी निधन झाले. गणपत पवार हे एसटी महमंडळातून कुडाळ सहाय्यक आगार व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. मूळ नरडवे गावचे रहिवासी असलेले गणपत पवार हे कलमठ ( सिद्धार्थ गृहनिर्माण कॉलनी ) येघे स्थायिक झाले होते. त्यांच्या पार्थिवावर नरडवे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कलमठ ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार , एसटी महामंडळातील अधिकारी पल्लवी पवार, फोटोग्राफर चेतन पवार यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चत पत्नी, मुलगे, मुली, सून,जावई नातवंडे, भाऊ, वहिनी, विवाहित बहीण, भावोजी असा परिवार आहे.

error: Content is protected !!