खारेपाटण शहर मर्यादित व गाव मर्यादित दोन गटात स्पर्धेचे विभाजन
प्रथम क्रमांक २०००० /- व चषक
प्रथम क्रमांक १५०००/- व चषक
खारेपाटण (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष खारेपाटणच्या वतीने भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आर्थात शिवसेना चषक स्पर्धा – २०२४ चे आयोजन दि. १५ ते १७ फेब्रुवारी २०२४ च्या दरम्यान श्री देव कालभैरव मंदिर खारेपाटण नजीक आठवडा बाजार मैदान येथे करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना पक्ष युवा सेना कार्यकर्ते श्री तेजस राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
खारेपाटण येथे आयोजन करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेचे खारेपाटण गाव वाडी मर्यादित एक गट व दशक्रोशीतील गाव मर्यादित एक गट अशा दोन गटात स्वतंत्र रित्या खेळविण्यात येणार असून खारेपाटण वाडी मर्यादित क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता संघाला रोख रुपये १५०००/- व आकर्षक चषक तर उपविजेता संघाला रोख रुपये ७०००/- व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तर खारेपाटण दशक्रोशी गाव मर्यादित क्रिकेट सर्धेच्या अंतिम विजेता संघाला रोख २०००० /- रुपये व आकर्षक चषक तर उपविजेता संघाला रोख १०००० /- रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याबरोबरच उत्कृष्ट गोलंदाज,फलंदाज,शेत्ररक्षक यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच या स्पर्धेकरिता प्रत्येक संघाला १५०० /- रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. ज्या संघाना या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे. त्यांनी आपली नावे दि. १३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्यांनी श्री.तेजस राऊत – ८२०८०५८१२३, निखिल गुरव – ९८३३३७७०१५,हर्षद राऊत -८४४६३९ ४९५७,भूषण कोळसुलकर यांचेकडे नोंदवावित असे आवाहन शिवसेना पक्ष खारेपाटणच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेचे सेमी फायनल २ सामने व अंतिम १ सामना हा यु ट्यूब लाईव्ह दाखविण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे – १) प्रत्येक सामना हा ४ षटकांचा खेळविण्यात येणार आहे. २) सर्व सामने लॉटस पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. ३) संघ वेळेत उपस्थित न राहिल्यास ५ रन्स ची पेनल्टी देण्यात येईल. ४) पंचाचा निर्णय अंतिम राहील. तरी या क्रिकेट स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा असे आवाहन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.












