लाखो भाविक कुणकेश्वर चरणी लिन
देवगड (प्रतिनिधी) : दक्षिण कोकणची काशी प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ होऊन १८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजले नंतर देवाचे पुजारी गुरव, ग्रामोपाध्ये, श्री मानकरी यांच्या पूजेनंतर शासकीय पूजा जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, उपविभागीय अधिकारी वर्षा सिंघल, तसेच आमदार नितेश राणे, नंदिता राणे, सुधीर जाधव, स्नेहल जाधव, यांच्या हस्ते करण्यात आली. हर हर महादेव, बंम बंम भोले, ओम नम: शिवाय जयघोषाने कुणकेश्वर नगरी भक्तीमय वातावरणामध्ये दुमदुमून गेली.
यावेळी तहसीलदार स्वाती देसाई, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, अरुण चव्हाण त्यानंतर देवसेवक यांनी दर्शन घेतले. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, सचिव शरद वाळके, कोषाध्यक्ष अभय पेडणेकर तसेच सदस्य संजय लाड, अजय नाणेरकर, विजय वाळके, संजय आचरेकर, प्रकाश वाळके, मंगेश पेडणेकर, अनिल धुरी, दीपक घाडी, रुपेश धुवाळी, सरपंच चंद्रकांत घाडी पदाधिकारी अध्यक्ष व सदस्य देवसेवक उपस्थित होते. यानंतर आरती होऊन भाविकांना दर्शनास सुरुवात झाली रात्री १० वाजलेपासून भाविक दर्शन रांगांमध्ये उभे होते. या निमित्ताने आम. नितेश राणे उभयता यांचा देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने शाल श्रीफळ प्रतिमा भेट देऊन देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावर्षी कुणकेश्वर यात्रा तिन दिवस असल्यामुळे तसेच सोमवती अमावास्येचा प्रारंभ असल्यामुळे तिर्थस्नानाला देखील गर्दी होणार आहे.
महाशिवरात्री कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. अनेक भाविक कुणकेश्वर चरणी नतमस्तक होवून भक्तीमय वातावरणामध्ये विलीन झाले. रात्री 2 वा.पासून जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीमध्ये शासकिय पुजा करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे,जिल्हा परिष्द मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,प्रांत अधिकारी वैशाली राजमाने व देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी पालकमंत्री दिपक केसरकर,आमदार वैभव नाईक,शिवसेना युवा नेते संदेश पारकर,अतुल रावराणे,आमदार नितेश राणे,आमदार प्रसाद लाड,वरेरी येथील दानशुर व्यक्ती रुपेश पारकर अनेक विविध राजकीय लोकांनी उपस्थिती दर्शवून कुंकोबाचे दर्शन घेतले.
दर्शनाच्या रांगा नियोजन बध्द असल्यामुळे प्रशासन व देवस्थानने दर्शनासाठी केलेले नियोजनही योग्य पध्दतीने असल्याने भाविकांना दर्शन सुलभरित्या मिळत होते. कुणकेश्वर शिवलिंगाला तिरंगाच्या रंगाप्रमाणे सजावट केल्यामुळे आकर्षन देखील ठरत होते. हरहर महादेव या एकच जयघोषाने कुणकेश्वर नगरी भक्तीमय वातावरणामध्ये वाहुन गेली होती. अनेक खादय दुकाने, मनोरंजनाचे खेळांची देखील दुकानेही थाटल्यामुळे भाविकांची खरेदीसाठी लगबक असल्याचे दिसून येत होते. पोलीस प्रशासनाने देखील योग्य पध्दतीने वाहतुकीचे नियोजन केल्यामुळे वाहतुक देखील सुरळीत पार पडत होती. अनेक ठिकाणी पोलीसांनी चौक्या व नाका नकावरती पोलीस बंदोबस्त् चोख ठेवल्यामुळे वाहतुकीसह सुरळीतपणे पार पडत होती. सायंकाळी देवस्वा-याही कुणकेश्वर भेटीसाठी दाखल झाल्या होत्या. समुद्र किनारी देखील पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.