कसा आहेस अतुल म्हणत उद्धव ठाकरेंकडून अतुल यांच्या स्वागताचा स्वीकार
सिंधुदुर्गं (प्रतिनिधी) : जनसंवाद दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे यांनी मोपा विमानतळावर केले. उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देत अतुल रावराणे यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर उद्धव यांनी कसा आहेस अतुल ? असे म्हणत अतुल यांचे स्वागत स्वीकारले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना बळ देणारा उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आहे.उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी स्वराज्य रक्षक योद्धा टॅगलाईन चे बॅनर बांदा ते खारेपाटण पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अतुल रावराणे यांनी लावले आहेत. स्वराज्य रक्षक योद्धा ही कल्पकता ही उद्धव ठाकरे यान सध्याच्या राजकीय स्थितीत लागू पडत असून हे बॅनर देखील लक्षवेधी ठरले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्यामुळे शिवसैनिकांत नवचैतन्य पसरले आहे.












