आमदार बंटीभाऊ भागडिया यांचे शुभहस्ते झाला शुभम पसारकर यांचा गौरव
खारेपाटण (प्रतिनिधी) : चिमूर तालुका प्रेस असोसिएशन चिमूर जिल्हा चंद्रपूर यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शालेय समूह नृत्य स्पर्धा २०२४ चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यवंदना आधार फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम राजू पसारकर यांना चिमुर क्रांतिभूषण पुरस्कार बंटीभाऊ भागड़िया (आमदार) यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
याप्रसंगी मंचावर चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस गजाननभाऊ बुटके, धनराज भाऊ मुगले, ज्ञानेश्वर शिरभय सर, कलीम शेख चुनीलाल कुडवे जी, चुनारकर , रविभाऊ भोंगले, अनिल भाऊ रेवतकर, नागेंद्र नागोसे तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र व शेकडो प्रेक्षक वर्ग उपस्थित होते.














