एमएसएमई च्या राष्ट्रीय चर्चासत्राचा लाभ स्थानिक उद्योजकांनी घ्यावा

केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या हस्ते उदघाटन संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे एमएसएमई उद्योगांची वाढ आणि विकास यांना असलेला वाव या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्रवजा प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिनांक 19 ते 21 फेब्रुवारी पा कालावधीत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या चर्चासत्रवजा प्रदर्शन कार्यक्रमासाठी केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उदघाटन कार्यक्रमात उद्यम असिस्ट पोर्टल अंतर्गत पाठबळ पुरवण्यात आलेल्या अनौपचारिक सूक्ष्म उद्योगका प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती केंद्राअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना सुदधा प्रमाणपत्रांचे वितरण केले गेले. सिंधुदुर्गातील जनसमृद्धी खादी ग्रामोद्योगात नव्याने सुरु करण्यात आलेल्या खादी संस्थेता चरखा तसेच हातमागांचे वितरण यावेळी करण्यात आले. एम एस एम इ अंतर्गत उभारण्यात आलेल्या यशस्वी उद्योजकांचे सत्कार कार्यक्रमात करण्यात आले. तसेच जिल्हा बँक द्वारे मंजूर करण्यात आलेल्या नवउद्योजकांना मंजूर निधीचे चेक प्रदान करण्यात आले.

एम एस एम इ. खादी ग्रामोद्योग, कॉपर बोर्ड इत्यादी विभागांतर्फे उभारण्यात आलेल्या उद्योजकांचे स्टॉल तसेच विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या स्टॉ भेट देऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी विशेषतः युवकांनी उद्योगधंदे उभारावेत, त्यांना आवश्यक असणारे सर्व सहकार्य एम एस एम इ विभाग नक्की करेल, असे आश्वासन नारायण राणे यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!