खारेपाटण येथे छ.शिवाजी महाराज जयंती निम्मित १६ व १७ फेब्रुवारी रोजी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : छ.शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निम्मित येथील पंचशील विकास मंडळ खारेपाटण पुरस्कृत व पंचशील क्रिकेट क्लब आयोजित भव्य खुल्या नाईट अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दी.१६ व १७ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले असून या स्पर्धेतील अंतिम विजेता संघाला रोख ७३९४ /- रुपये तर उपविजेता संघाला रोख रुपये ५३९४ /- रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

सदर अंडर आर्म नाईट क्रिकेट स्पर्धा खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारा समोरील पटांगणावर विद्युत प्रकाश झोतात खेळवली जाणार असून या स्पर्धेचा शुभारंभ दी.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं.६.३० वाजता करण्यात येणार आहे.तर प्रथम येणाऱ्या फक्त २४ संघानाच या स्पर्धेत सहभाग देण्यात येणार आहे. याबरोबरच या स्पर्धेतील उत्कृष फलंदाज, गोलंदाज व मालिकावीर याना देखील आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता प्रवेश फी रोख ५०० /- रुपये ठेवण्यात आली असून ज्या संघाना या सर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे त्या संघांनी आपली नावे दी.१४/२/२०२४ पर्यंत क्रिकेट मंडळाचे कार्यकर्ते ललित पाटणकर – ७०५८८९८३७५,विराज पाटणकर – ९०२८७३०४६८,प्रथमेश कदम – ९०११७४३९७६,प्रियाल पवार – ९३२५१६३७७४ यांचेकडे दूरध्वनी द्वारे नोदवावित असे आवाहन पांचशिल विकास मंडळ खारेपाटण च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!