आचरा (प्रतिनिधी) : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारची यशोगाथा तळागाळापर्यंत जनसामान्य नागरिकां पर्यंत पोहचविण्यासाठी आणि देशातील जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकण्याच्या दृष्टीने भाजप पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या आदेशाने राबविण्यात येत असलेल्या ‘गाव चलो अभियानाला चिंदर ग्रामपंचायतीतून आज भाजप पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, मालवण माजी नगरसेवक पूजा करलकर, पूजा वेरळकर भाजप पक्षाचे कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थीतीत गाव चलो अभियानाला सुरवात करण्यात आली. यावेळी शक्ती केंद्र प्रमुख दत्ता वराडकर, सरपंच स्वरा पालकर, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रा.पं.सदस्य दुर्वा पडवळ, जान्हवी घाडी, सानिका चिंदरकर, आचरा प्रभारी संतोष गावकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, रवींद्र घागरे, सिद्धी पडवळ, तलाठी रविराज शेजवळ, दिगंबर जाधव, प्राजक्ता पडवळ, विनिता मसुरकर, संतोष अपराज, निशिगंधा वझे, केळसकर, रतन बुटे आदी उपस्थित होते.










