खारेपाटण येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व डोंबिवली शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमीत्त सार्वजनिक हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

शिवसेना शाखा खारेपाटणचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व मंबई डोंबिवली येथील शिवसेना नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य व कल्याण तालुका संपर्क प्रमुख रमेशजी म्हात्रे यांच्या संयुक्त वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना शाखा खारेपाटण यांच्या वतीने महिलांसाठी सार्वजनिक हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच येथील शिवसेना शाखा कार्यालयात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला शिवसेना महिला जिल्हाप्रमुख व संघटक सौ वर्षाताई कुडाळकर यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह या कार्यक्रमाला भेट देत हळदी कुंकू समारंभास शुभेच्छा दिल्या.यावेळी महिला जिल्हा उपसंघटक सौ नंदिनी पराडकर, खारेपाटण ग्रा.पं.सदस्या अस्ताली पवार, शितिजां धुमाळे, सामाजिक कार्यकर्त्या गौरी शिंदे, निळा मुकादम आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.

शिवसेना पक्षाच्या वतीने खारेपाटण येथे महिलांसाठी हा पहिलाच सार्वजनिक हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात येत असल्यामुळे उपस्थित सर्व महिलांना गोड पदार्थ म्हणून पाव किलो गूळ व एक सुंदर असे फुलपात्र भेट स्वरूपात देण्यात आले.तर सुमारे ५०० पेक्षा अधिक महिलांनी ह्या हळदी कुंकू समारंभाचा लाभ घेतला.हा संपूर्ण कार्यक्रम खारेपाटण गावचे सुपुत्र व डोंबिवली येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांनी पुरस्कृत केला होता.

तर या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख सुकांत वरुणकर,शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंगेश ब्रह्मदंडे, खारेपाटण ग्रा.पं. सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे,खारेपाटण गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत यांनी केले होते. शिवसेना खारेपाटण पक्षाच्या वतीने प्रथमच अशा प्रकारे भव्य सार्वजनिक हळदी कुंकु समारंभाचे आयोजन करून महिलांचा सन्मान केल्यामुळे गावातील महिलांनी आयोजकां बदल आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!