जेव्हा दोन चिमुकले घरी साजरी करतात शिवजयंती…

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज शिवरायांची ३९३वी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होत आहे. लहान थोरांपर्यंत सारेजण छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रेरणा म्हणून पाहतात. भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आणि कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी केली. तर कलमठ येथील त्यांच्या निवासस्थानी मिलिंद यांचा सुपुत्र आणि संदीप यांच्या सुपुत्राने शिवपुतळ्याचे पूजन करत शिवजयंती साजरी केली. घराघरात शिवबा जन्माला येण्यासाठी शिवरायांचे विचार रुजण्यासाठी घराघरातून संस्कार मिळणे आवश्यक असते. मिलिंद आणि संदीप यांच्या सुपुत्रांकडे पाहून ही शिकवण घराघरात रुजत असल्याचे दिसून येईल.

error: Content is protected !!