धामापूर येथे आरोग्य व नेत्रतपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवजयंती निमित्त ग्रामपंचायत धामापूर , कोकण कला व शिक्षण विकास संस्था,ग्लोबल फाउंडेशन यांचे यशस्वी आयोजन

चौके (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून आज रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. मानसी परब यांच्या संकल्पनेतुन ग्रामपंचायत धामापूर आणि कोकण कला शिक्षण विकास संस्था आणि ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत धामापूर येथे मोफत आरोग्य शिबीर व नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरास धामापूर ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरामध्ये ७५ जणांनी आरोग्य तपासणी करून घेतली तर ८५ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्य तपासणीत आढळलेल्या रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली आणि नेत्रतपासणीत ज्यांना चष्मे लागणार आहेत त्या ३३ लाभार्थ्यांना सरपंच सौ मानसी परब या स्वखर्चाने चष्मे उपलब्ध करुन देणार आहेत. आहेत.

तत्पूर्वी धामापूर सरपंच सौ मानसी परब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दिपप्रज्वलन करून आरोग्य आणि नेत्रतपासणी शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच रमेश निवतकर , माजी सरपंच ज्ञानेश्वर परब,मानसी धामापूरकर,पार्वती धामापूरकर,शंकर धामापूरकर,सामाजिक कार्यकर्ते महेश धामापूरकर,महेश परब , रवींद्र कदम, सदस्य प्रशांत गावडे,जयश्री थवी, साक्षी नाईक,तेजस्विनी भोसले, स्वप्निल नाईक,अस्मिता फोपळे ग्रामसेवक पी. टी. पेडणेकर,बौद्धवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिपक गोसावी,नेत्रतज्ञ डॉ. मिनर्वास परब,डॉ. प्रणव प्रभु,लक्ष्मण देसाई,आशिष परब,अदिती तवटे,ग्लोबल फाऊंडेशनचे उमेश गावडे, शशिकांत गावडे, अमोल परब, प्रविण परब,बाबू तोरसकर, आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी धामापूर बौद्धवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिपक गोसावी यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देउन विशेष सन्मान करण्यात आला. सदर आरोग्य व नेत्रतपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत धामापूर , कोकण कला व शिक्षण विकास संस्था, ग्लोबल फाउंडेशन च्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!